Saturday, August 30, 2025

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा
असा दूर दूर जाऊ
तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी
नको बावरून पाहू

कुठवर जाशील रे 
दूरवर सरकून?
घसरून पडशील
बाक जाईल संपून 

नको असता बागेत 
गर्दी आहे माणसांची
माझा होकार असता 
भीती कशाला कुणाची

बघतात, हसतात
लोक जमलेले सारे
तुला काही समजेना
माझे अबोल ईशारे

विनवीते साजणा रे 
पुरे छळवा दुरावा
माझे सरकणे हाच
माझ्या प्रीतीचा पुरावा


- संदीप भानुदास चांदणे (शनिवार, ३०/०८/२०२५)

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...