फूल नाही पाती नाही
रण रण माथ्यावर
अंगाची लाही लाही
दिसेना दूरवर कोणी
कुठे जायचे कळेना
जड झाले मन
आणि पायही उचलेना
कुठवर चालू मी?
कळेना वेळ, काळ, दिशा
दिनी दीन बंदीवान मी
अंधारकोठडी दावी निशा
कसा पडलो या जगी
माथी घेऊन निराशा
स्वतः पाडाव्या लागती
तळहातावर रेषा
नित भिजते धरती
आठवांच्या आसवांनी
हाका विरल्या हवेत
परतुनी नाही कोणी
झुळूक एक शीत
तिच्या गंधासवे आली
शुष्क, कोरडी माझी सृष्टी
चिंब पावसात न्हाली
बहरला हा माळ
फूल पाती बहरली
माथ्यावर तोच सूर्य
धरी मायेची सावली
संदीप चांदणे...
No comments:
Post a Comment