आलो तुझ्याचसाठी
सेव्हन समुद्रावरून
कंटाळून नुसते, प्रेमाला
सदा करून ऑनलाईन
कमवून आलो सखये
कमवून आलो सखये
काही बंडल डॉलरांचे
निवांत फिरूया दोघे
सारे स्पॉट टुरिस्टांचे
यंदाच शुभमंगल करून
पुढच्या वर्षी लिटल सन
पाहतो उघड्या डोळ्यांनी
ड्रीम हे फ्लाईटात बसून
यंदाच शुभमंगल करून
पुढच्या वर्षी लिटल सन
पाहतो उघड्या डोळ्यांनी
ड्रीम हे फ्लाईटात बसून
हाय! पडला छाप हाती
विथ सरकारी डिझाईन
तू तिकडे लुकिंग फॉर्वर्ड
मी इकडे क्वारंटाईन!
- संदीप भानुदास चांदणे (०४/०४/२०२०)
- संदीप भानुदास चांदणे (०४/०४/२०२०)