Tuesday, December 20, 2022

दे दवांचे प्याले

कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले
शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले

जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे?
तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले

माळून दे म्हणालीस, माला तारकांची
केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले

भेटता तुला उराशी, श्वासात आग येते
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले

घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग
दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले

- संदीप चांदणे (बुधवार १४/१२/२०२२)

No comments:

Post a Comment

नाकाम मुहब्बत का इनाम हो तुम

किसी नाकारा दुवा की इंतेहा हो तुम कयामत है के अभी तक जिंदा हो तुम सामने आती हो तो यकी नही आता लगता है खुली आंखो का सपना हो तुम अंजाम मुफ्लीस...