Tuesday, December 20, 2022

गुलाब

बरेच दिवस झालं गुलाबाचा सुगंध श्वासात मन भरेपर्यंत भरून नाही घेतला.
कित्येक दिवसांत, फांदीवर पूर्णपणे उमललेल्या त्याच्या पाकळ्यांचा मखमली स्पर्श ह्रदयावर उमटेपर्यंत हाताळला नाही.
वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची अनेक गुलाबं एकाच ताटव्यात अलीकडे बघितली नाहीत.
कोणता गुलाब तिच्यासाठी घ्यावा असा प्रश्नही कित्येक दिवसांत पडला नाही.
लहानपणी हरखून जायला व्हायचं एक टवटवतीत फुललेलं गुलाबाचं फूल बघून.
कितीही त्याकडे बघितलं तरी मन भरायचं नाही.
तसंच व्हायला हवंय आत्ता पण नेमकं काय झालंय कळत नाही.
गुलाब संपलेत, का मलाच दिसत नाहीत ते असताना?

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, २७ जानेवारी २०२२)

No comments:

Post a Comment

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...