Wednesday, May 28, 2025

एक अर्थहीन गजल

आहे अंगणात वारा, निवारा घरात आहे
तरी माजला कल्लोळ कसला मनात आहे?

रोज तसाच दिवस, तसलीच रात्रही येते
बदलून नव्या फक्त दुःखाची आयात आहे

कुठलाच सूर आनंदी येईना बासरीतून
इतकी उदासवाणी माझी हयात आहे

सूर्याची दैवी थाळी गोष्टीमध्येच राहिली
आता उघड्यावर उपडी माझी परात आहे

मदतीस धावणारे आता ना पाय दिसती
दिसते ती निघालेली कोडगी वरात आहे

- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, २८/०५/२०२५)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...