Monday, October 7, 2024

सताड उघडे दार किरमीजी

सताड उघडे दार किरमीजी
पहाटेच्या भलत्या समयी
घडले काही विपरीत नक्की 
पाहून शंका मनात येई

चौर्यकर्म का असेल घडले?
का, अजून व्हावयाचे आहे?
मनात येई, तडकाफडकी 
धीटपणाने पाहून यावे

पुन्हा वाटे मनास दुसऱ्या
लटके तिथे जाऊन बघावे 
चोर चोर हाका घुमाव्या 
नसते बालंट अंगी यावे

नाहीतर चित्र भलते दिसावे  
कुणास ना सांगण्याजोगे  
बोलताच पसरेल असे की
लोणी जणू विस्तवासंगे 

जळोच ते दार किरमिजी
सताड जे उघडे आहे
कशास जाऊ त्या गावा
विनाकारण परीक्षा पाहे

- संदीप भानुदास चांदणे (गुरूवार, १०/१०/२०२४)

No comments:

Post a Comment

खुदा ही बन जाते

एक खयाल यूं हैं, अगर बन पाते तो खुदा ही बन जाते काफीर हूं इसीलिए दुवामें हाथ नहीं उठाये जाते  - संदीप भानुदास चांदणे (गुरूवार , १७/१०/२०२४)