Friday, January 27, 2017

लक्ष्मीहार

सांगू कशी मी बाई
कसं, कळलंच नाही
येळ सरना ह्यो भारी
जीव जीवाला खाई

त्याला जपलं मी फार
दिलं काळजात घर
आणि मिरविलं जगी
आज, गुमला चंद्रहार

दागिना महाग दिलेला
पारखून घडलेला
अर्धा सख्याचा, माझा
त्यात जीव जडलेला

सख्या दौडत येईल
मन भरून पाहील
कवातरी त्याच ध्यान
माझ्या गळ्यात जाईल

मागं, उतरल्या पायी
सखा वळूनिया जाई
काळजात लक्क माझ्या
आज आक्रीत होई

काय अवदसा झाली
कुठ खळ्याला गेलेली?
बाई मोठ्या घरची मी
कशी खळीला आलेली!

असा गेला, असा आला
सख्या हासत, उधळत
नवा साजिरा लक्ष्मीहार
बाई, त्याच्या ग हातात!

- संदीप चांदणे (७/२/२०१७)

No comments:

Post a Comment

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...