Monday, July 19, 2021

हा पक्षी उडाला

हा पक्षी उडाला
वाऱ्याला शीळ देत
भवताल जागवित
राने वने फुलवित

हा पक्षी उडाला
स्वैरपणे विहरण्या
निळेभोर नभ सारे
कवळून टाकण्या

हा पक्षी उडाला
चाऱ्यासाठी नव्हे
थवा होऊनि उडण्या
सोबती ज्यांना हवे

- संदीप चांदणे (सोमवार, १९/०७/२०२१)

No comments:

Post a Comment

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये  बहुतेक तो कढत होता  शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  पापण्या झुकल्या खाल...