Tuesday, March 16, 2021

आयुष्याचं सोनेरी पान

तुमच्या माझ्या आयुष्यातलं एक पान विरलेलं असतं 
बघता बघता एक वर्ष पुन्हा एकदा सरलेलं असतं

लहान मोठं कसंही असो कडू-गोड आठवणींचं पान
वहीत ठेऊन जपायचं हे, तुमचं माझं ठरलेलं असतं

एकेका टप्प्यावर एकेक पान उगवून येतं, फुलत जातं 
मागे ठेवून अशी पानं आयुष्य पुढेच चाललेलं असतं

तुम्ही, मी, वा आणखी कोणी विसावल्यावर अभिमानाने
ह्यातलंच एखादं तरी हाती, सोनेरी पान धरलेलं असतं

संदीप भानुदास चांदणे (बुधवार, ३१/१२/२०२०)

No comments:

Post a Comment

रोशनदान

कभी हुआ करता था जो एक शानदार मेहराबदार रोशनदान आज उसकी शान-ओ-शौकत एक पान की दुकान नोचती हैं उस ठेलेपर तो जमघट लगताही होगा बेकदरदान जमाने का ...