रूणझुणती चांदणी
गुणगुणती पहाट
पुरवेच्या आभाळास
आता सुर्व्याचीच वाट
नीज सोडून चालली
रात घाबरीघुबरी
वळूनिया पाही मागे
जाग आली दारोदारी
जणू सूर सतारीचे
घुमती चारीठाय
पडे अंगणी सड्याच्या
एक पैंजणाचा पाय
- संदीप चांदणे (मंगळवार, १२/०२/१९)
मधुर शीळ मी वार्याची, पावसाची मी सन्ततधार, सडा पाडतो गीतांचा, मी शब्दांचा जादूगार....
नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून नको असता ...
No comments:
Post a Comment