Sunday, May 17, 2020

मास्क

चेहर्‍यावरचा मास्क बरा
जो चेहरा झाकून घेतो
आपल्या आत जे असेल
ते आपल्यापाशी ठेवतो

उघडउघड जी मुखकमले
दिसती आणिक हसती
कसे कळावे ओठी त्यांच्या
हसू, की, स्मिते जळकी?

चेहरा लपवलात तरी
डोळ्यांचं काय करणार?
किती नाही म्हटलं तरी
ते सारं उघडं पाडणार!

- संदीप भानुदास चांदणे (१३/०५/२०२०)

No comments:

Post a Comment

सरताज

खामोश तुम हो बेआवाज हूं मैं बेचैन बदहवास  परवाज हूं मैं तुम्हारे ही चर्चे  जमाने भर में हैं  हिजरत-ए-वफा  गमनवाज हूं मैं बेदखल आंखे बरसती रह...