Friday, April 25, 2025

जागृत सत्य

इतिहासात काय
वर्तमानात काय
किंवा भविष्यात काय
हे आहे असंच राहणार

बळी कान पिळणार
दुबळे भरडले जाणार
येनकेन प्रकारे सारे 
सत्तेसाठी होत राहणार

न्याय न्याय म्हणतात तो 
व्यक्ती, समूह, प्रांत, भाषा
इत्यादी सापेक्ष असतो
तो तसाच मिळत राहणार

काळावर छाप सोडणारी
काही कल्पतरूही डोलतात
कालांतराने मात्र त्यांच्यावरची
बांडगूळंच शिल्लक राहणार

- संदीप भानुदास चांदणे (शुक्रवार, २५/०४/२०२५)

No comments:

Post a Comment

बाकावरचे सरकणे

नको नको रे साजणा असा दूर दूर जाऊ तुझ्या बावऱ्या डोळ्यांनी नको बावरून पाहू कुठवर जाशील रे  दूरवर सरकून? घसरून पडशील बाक जाईल संपून  नको असता ...